वेंगुर्ला येथील माजी विद्यार्थ्यांनी केला गुरूजनांचा सत्कार.

वेंगुर्ला येथील माजी विद्यार्थ्यांनी  केला गुरूजनांचा सत्कार.

वेंगुर्ला 

 

           वेंगुर्ला येथील अणसूर पाल हायस्कूल च्या एसएससी १९९५-९६ बॅचची स्नेहभेट उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सर्व उपस्थित माजी विद्यार्थ्यांचे स्वागत पर्यावरण सुपारीचे रोपटे  देऊन करण्यात आले.शाळा-गुरुजनांचे ऋण फेडण्यापलीकडचे असून, त्या ऋणात राहून गुरुजनांचे आशिर्वाद घेण्यातच खर सुख आहे, असे भावोद्गार अणसूर पाल हायस्कूलच्या एसएससी सन १९९५-९६ बॅचचे संयोजक अभिजित गावडे, शंभा परब, दिलीप मांजरेकर, शिल्पा गावडे, नेत्रा पालकर यांनी काढले.स्नेहभेटीची सुरुवात शाळेची घंटा वाजवून व सर्व आजी माजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना ओवाळून व पुष्पवृष्टी करून करण्यात आली. माजी विद्यार्थी दिलीप मांजरेकर व शंभा परब यांनी गणेशवंदना, स्वागतगीत व इशस्तवन सादर केले. यानंतर माजी मुख्याध्यापक मातोंडकर तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन आणि  संस्थाध्यक्ष आत्माराम गावडे यांच्या हस्ते सरस्वती पुजन करण्यात आले. माजी विद्यार्थी अभिजित गावडे यांनी या स्नेहभेटीचा उद्देश, यासाठी अनेक माजी विद्यार्थ्यांनी घेतलेला  पुढाकार व मेहनत प्रास्ताविकातून स्पष्ट करीत गतस्मृतींना उजाळा दिला. शाळेच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा या विविध ठिकाणी नोकरी- व्यवसायानिमित्त असणाऱ्या एसएससी १९९५-९६ च्या वर्गातील सर्व  माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन, शाळा व गुरुजनांच्या विविध आठवणींना उजाळा देत तत्कालीन मुख्याध्यापक एम. जी. मातोंडकर, वर्गशिक्षका शैलजा वेटे, इंग्रजी विषय शिक्षिका अक्षता पेडणेकर- सातार्डेकर, मराठी व हिंदी विषय शिक्षिका ऋतुजा सामंत, शाळा मुख्याध्यापक राजेश घाटवळ, शिक्षक विजय ठाकर, शिक्षिका चारूता परब, शिक्षकेतर कर्मचारी सुधीर पालकर, जगदीश गावडे, रामचंद्र भोई, अशोक पालकर, किशोर पालकर यांचा शाल व श्रीफळ, शिवप्रतिमा, भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. यावेळी आपल्या शालेय जीवनातील अनेक गमतीजमती, प्रेरणा देणा-या घटना, विविध शालेय व क्रीडा स्पर्धेतील मिळवलेले यश, आपल्या वैयक्तिक आयुष्यात गाठलेल्या प्रगतीतील शाळा व गुरुजनांची असलेली महत्वपूर्ण भूमिका याविषयी माजी विद्यार्थी अभिजित गावडे, दिलीप मांजरेकर, शंभा परब, शिल्पा गावडे, नेत्रा पालकर, सपना गावडे, रामचंद्र मालवणकर, दिपावली सावंत, महेंद्र गावडे, वैजयंती गोडबोले, निला पालकर, मंगल गावडे, संत़ोष पालकर, सुदेश सावंत, संजय गावडे, नंदा देऊलकर, राकेश सावंत, रोहिणी राऊळ, कविता गावडे, मनोज गावडे, निलिमा बर्वे, सावळाराम लाड, ज्ञानेश्वर पालकर, प्रतिभा गावडे यांनी आपल्या भावना व मनोगत व्यक्त केल्या. यानंतर माजी मुख्याध्यापक व शालेय समिती चेअरमन एम. जी. मातोंडकर  यांनी मार्गदर्शन करीत अन्य माजी विद्यार्थ्यांनीसुद्धा शाळेला स्नेहभेट देण्यासाठी आवाहन केले. यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या अनेक आठवणींना शिक्षिका शैलजा वेटे, अक्षता पेडणेकर - सातार्डेकर, राजेश घाटवळ यांनी उजाळा देत माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनात प्राप्त यशाबद्दल आनंद व्यक्त करीत भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेबद्दल कृतज्ञता म्हणून एसएससी या सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्रितरित्या जमा केलेली रू.५०,०००/- ची देणगी अणसूर पाल विकास मंडळ मुंबई संस्थेकडे सुपूर्द केली. संस्थाध्यक्ष आत्माराम गावडे यांनी अणसूर पाल विकास मंडळ मुंबई संस्थेच्यावतीने सर्व माजी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन कौतुक करीत दिलेल्या देणगीबद्दल आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संयोजक शंभा परब व आभार दिलीप मांजरेकर यांनी मानले.