खर्डेकर महाविद्यालयात मतदान नोंदणी शिबिर संपन्न.

खर्डेकर महाविद्यालयात मतदान नोंदणी शिबिर संपन्न.

वेंगुर्ला.

   येथील बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयातील आजीवन अध्ययन विस्तार विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागा यांच्या वतीने मतदार नोंदणी व मतदान जागृती कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी वेंगुर्ला नायब तहसीलदार संदीप पानमंद, महसूल सहाय्यक अनुराधा परब,   तलाठी दिनेश गाभुड ,तलाठी केशव धुमाळे यांनी विद्यार्थ्यांना मतदान नोंदणी विषयी मार्गदर्शन केल्यावर विद्यार्थ्यांकडून मतदान नोंदणी करून घेतली. सदरील कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आनंद बांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
   यावेळी आजीवन अध्ययन विस्तार विभागाचे समन्वयक प्रा. विवेक चव्हाण,राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सदाशिव चुकेवाड,डॉ.सुनील भिसे व प्रा.एल. बी. नैताम, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच महसूल विभागाचे कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.