जल जीवन मिशन अंतर्गत लघुचित्रपट स्पर्धांचे आयोजन.

जल जीवन मिशन अंतर्गत लघुचित्रपट स्पर्धांचे आयोजन.

सिंधुदुर्ग.

  जल जीवन मिशन अंतर्गत खुल्या गटाकरीता लघुचित्रपट स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपले लघुचित्रपट दिनांक 15 जानेवारी 2024 पर्यंत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे सादर करावेत, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.
   जल जीवन मिशन च्या प्रभावी प्रचार प्रसिध्दी करीता जिल्हास्तरीय खुल्या लघुचित्रपट स्पर्धाचे आयोजन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद विधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी लघुचित्रपटाची निर्मिती स्वत: केलेली असावी. पटकथा, दृश्य,  संकल्पना, संवाद, पार्श्वसंगित, गीत, चित्रिकरण स्वत: केलेले असावे.  या अगोदर प्रकाशित झालेले किंवा व्यक्ती, संस्था, कंपनी, शासकीय विभाग त्यांनी त्यांच्या कामाकरीता तयार केलेले चित्रपट या स्पर्धेकरीता सादर करण्यात येऊ नयेत, लघुचित्रपट निर्मिती करीता वापरण्यात आलेले साहित्य प्रोफेशनल दर्जाचे व उत्तम असावे. लघुवित्रपट निर्मिती करीता वापर हा प्रमाण मराठी व कोणाच्याही भावना अस्मिता दुखावणारे नसावे. या स्पर्धेकरीता ३ ते ५ मिनिट कालावधीचा लघुचित्रपट तयार करावयाचा आहे. कॉपी राईट उल्लघन होत नसलेबाबत स्वयंघोषणापत्र स्पर्धकांनी स्वत: द्यावयाचे आहे.
  या स्पर्धेकरीता लघुचित्रपटाचे विषय १. पाण्याचे शाश्वत स्रोत २. पाणी पुरवठा देखभाल दुरुस्ती ३. जल संवर्धन ४.हर घर जल घोषित गाव ५. जल जीवन मिशन यशोगाथा ६. विविध योजनांचे कृती संगम प्रमाणे आहेत. तर स्पर्धेकरिता बक्षीस रक्कम रुपये प्रथम क्रमांक ३१ हजार. व्दितीय २१ हजार व तृतीय ११ हजार व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र अशी असणार आहे. या स्पर्धेकरीता जमा करण्यात आलेले लघुचित्रपट स्पर्धेसाठी पात्र व निवडीचे अधिकार प्रकल्प संचालक, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्याकडे असतील.
  जिल्हास्तरीत खुल्या लघुचित्रपट स्पर्धेत जिल्ह्यातील लघुचित्रपट निर्माते यांनी सहभाग घेऊन आपले लघुचित्रपट दिनांक १५ जानेवारी २०२४ पर्यंत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचेकडे सादर करावेत.