मडगाव - पनवेल - मडगाव विशेष गाडीचे आरक्षण सुरू.

मडगाव - पनवेल - मडगाव विशेष गाडीचे आरक्षण सुरू.

सिंधुदुर्ग.

  गणेशोत्सवामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाढलेली गर्दी लक्षात घेऊन दि. १५ सप्टेंबर २०२४ रोजी मडगाव ते पनवेल मार्गावर विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. एकूण २० एलएचबी डब्यांसह ही गाडी धावणार आहे. या विशेष गाडीचे आरक्षण दि. १० सप्टेंबरपासून सुरु झाले आहे.गणपती विसर्जनानंतर वाढलेली गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या सहयोगाने गर्दीनुसार विशेष गाड्यांचे नियोजन करण्याचे धोरण स्वीकारले आहे.