तांत्रिक बिघाडमुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे हाल.

तांत्रिक बिघाडमुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे हाल.

मुंबई.

    मुंबईच्या लोकल सेवेमागील शुल्ककाष्ठ काही संपण्याची चिन्हे दिसत नाही. आज सकाळी बोरिवली रेल्वे स्थानकावर केबल तुटल्याने पश्चिम रेल्वेची सेवा पुन्हा विस्कळीत झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे येथील अनेक लोकल या उशिराने धावत आहेत. तर बोरिवली स्थानकात केबलमध्ये बिघाड झाल्याने प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वरून सोडण्यात येणाऱ्या उपनगरीय गाड्या स्थानकातच थांबल्या असल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत.
   मुंबईतील बोरिवली स्थानकात केबल तुटल्याने तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाले आहे. बोरिवली हे उत्तर मुंबईतील सर्वात वर्दळीचे रेल्वे स्थानक असून येथून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी आणि चाकरमानी लोकल सेवेचा वापर करतात. या बिघाडामुळे अनेक लोकल गाड्या या मध्येच थांबून असल्याची माहिती आहे. बोरिवली स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वरून केबल तुटल्याने काही ट्रॅक चेंजिंग पॉईंट बंद पडल्याने उपनगरीय गाड्या रोखण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या प्रवक्त्याने दिली. स्थानकातील उर्वरित प्लॅटफॉर्म ३ ते ८ वरून गाड्या चालविल्या जात आहेत. पश्चिम रेल्वेने सांगितले की, तुटलेल्या केबलची दुरुती तातडीने हाती घेण्यात आली आहे. या ठिकाणी संचारबंदी करण्यात येत असून लोकलसेवा पूर्वपदावर आणण्यासाठी प्राधान्याने दुरुस्तीचे काम सुरू आहे.