कसाल रिक्षा संघटनेच्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना माजी आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती.

कसाल रिक्षा संघटनेच्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना माजी आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती.


कुडाळ 
         कसाल रिक्षा चालक-मालक सेवा संघटनेच्या वतीने रविवारी आयोजित केलेल्या श्री सत्यनारायण महापूजा व सांस्कृतिक कार्यक्रमांना माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. यावेळी संघटनेच्या वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या. रिक्षा संघटनेच्या वतीने वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात आला तसेच कसाल सर्व्हिस रोडवर संरक्षक भिंत बांधून दिल्याबद्दल वैभव नाईक यांचे विशेष आभार मानण्यात आले.याप्रसंगी अवधूत मालणकर, बाळा कांदळकर, गिरी मर्तल, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष एन डी सावंत, सुनील आचरेकर, राघोजी कदम, बंड्या कामतेकर, सुहास परब,किशोर कसालकर, अशोक आचरेकर यांसह रिक्षा संघटनेचे सर्व पदाधिकारी, सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.