परुळे शेळपी येथील फुगडी संघाने डोंबिवलीतील कोकण महोत्सवात रसिकांची मने जिंकली.

परुळे
लोकसेवा समितीचा कोकण महोत्सव 24 जानेवारी ते 4 फेब्रुवारी पर्यंत डोंबिवली येथे सुरू असुन यात सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम यांची रेलचेल आहे. या महोत्सवात परुळे शेळपी येथील जरीमरि फुगडी संघ यांच्या फुगडीने रसिकांची मने जिंकली. आमदार रविन्द्र चव्हाण यांच्या आशीर्वादाने येथे भरत असलेल्या या महोत्सवात कोकणातील लोककला पाहण्याचे भाग्य डोंबिवलीकरना मिळत. यामध्ये दशावतार, नमन, भजन, कीर्तन, फुगडी, गोफ या लोककलेचा आनंद घेता येतो. यंदा परुळे शेळपी येथील महिलांच्या फुगडी संघाला आपली कला सादर करण्याची संधी मिळाली त्यांचे या मंडळाने सोने केले. आपली सांस्कृतिक परंपरा जपण्याचे काम या महिलांनी केले आहे. या फुगडी संघाने आतापर्यंत जिल्ह्यात बर्याच ठिकाणी कार्यक्रम केले आहेत.