शिरोडा येथील नुकसानग्रस्तांना भाजप वेंगुर्ला तालुक्याच्यावतीने आर्थिक मदत.

शिरोडा येथील नुकसानग्रस्तांना भाजप वेंगुर्ला तालुक्याच्यावतीने  आर्थिक मदत.

वेंगुर्ला 
    शिरोडा परबवाडी येथील रहिवाशी सदिप मोहन परब यांच्या घराचे काही दिवसापूर्वी पाऊस, वा-यामुळे माड पडून नुकसान झाले होते त्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी तालुक्यात यांची माहिती भाजप शिरोडा शहरचे पदाधिकारी विकास परब व भाजप, शिरोडा ग्रामपंचायत सदस्य मयूरेश शिरोडकर यांनी दिली होती. त्यानंतर भाजप शिरोडा शहरच्या पाठपुराव्यामुळे राजन तेली  यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप वेंगुर्ला तालुक्याच्यावतीने त्यांच्या परबवाडी येथील निवासस्थानी त्यांना आर्थिक मदत देण्यात आली.
    यावेळी रेडी जि.प.सदस्य प्रितेश राऊळ, भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई,भाजप वेंगुर्ला तालुका अध्यक्ष सुहास गवंडळकर, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, मनवेल फर्नाडिस, शिरोडा शहर भाजप अध्यक्ष श्रीकृष्ण धानजी, भाजप शिरोडा ग्रामपंचायत माजी सरपंच मनोज उगवेकर,शिरोडा माजी उपसरपंच राहुल गावडे, शिरोडा,रेडी, आरवली,आसोली, भाजप शक्ती केंद्र प्रमुख अनुक्रमे विदयाधर धानजी,जगन्नाथ राणे,महादेव नाईक,विजय बागकर,भाजप शिरोडा शहर पदाधिकारी चंद्रशेखर गोडकर,विकास परब,दत्ताराम फटजी,भाजप शिरोडा ग्रामपंचायत सदस्य मयूरेश शिरोडकर,आरवली ग्रामपंचायत भाजप सरपंच तातोबा कुडव,आरवली ग्रामपंचायत सदस्य समीर कांबळी,भाजप आरवली ग्राम कमिटी सदस्य सौ.नंदिनी आरोलकर, विश्वनाथ उर्फ भाई शेलटे,भाजप आरवली हिंतचिंतक संतोष मातोंडकर,सागरतीर्थ भाजप पदाधिकारी देवेंद्र उर्फ बाळू वस्त मान्यवर उपस्थित होते.