‘शिवराज भूषण’ नाटकात विनोद राणेंचा बाजीप्रभू देशपांडे दमदार; राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कारासाठी निवड

‘शिवराज भूषण’ नाटकात विनोद राणेंचा बाजीप्रभू देशपांडे दमदार; राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कारासाठी निवड

सांगली 



    सांगली येथील विष्णुदास भावे नाट्यमंदिरात सादर झालेल्या ‘शिवराज भूषण’ या ऐतिहासिक नाटकात परुळे गावचे सुपुत्र व आंबे गाळी वाडीचे रहिवासी श्री. विनोद संभाजी राणे यांनी शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांची दमदार भूमिका साकारत रसिकांची मने जिंकली.विनोद राणे यांनी ऐतिहासिक व्यक्तिरेखेचा सखोल अभ्यास करून ही भूमिका साकारली. त्यांच्या संवादफेकीतील धार, प्रभावी देहबोली आणि व्यक्तिमत्त्वातील स्वामिनिष्ठेचा आविष्कार यामुळे बाजीप्रभूंचे शौर्य, त्याग आणि पराक्रम रंगमंचावर जिवंत झाल्याची प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिली. विशेषतः बाजीप्रभूंच्या बलिदानाच्या प्रसंगातील अभिनयाचे विशेष कौतुक झाले.‘शिवराज भूषण’ या नाटकातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यनिर्मितीतील शौर्यपूर्ण प्रसंग प्रभावीपणे मांडण्यात आले होते. या नाट्यप्रयोगाला प्रसिद्ध विचारवंत संभाजी भिडे यांची विशेष उपस्थिती लाभली होती.या उल्लेखनीय अभिनयासाठी विनोद संभाजी राणे यांची राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, अभिनय क्षेत्रातील पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.