वैभववाडीत आनंदीबाई रावराणे स्मृतिदिनानिमित्त बॅडमिंटन स्पर्धा संपन्न.
वैभववाडी.
महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेच्या आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आनंदीबाई रावराणे यांचा शुक्रवार दि.८ डिसेंबर २०२३ रोजी २९ वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. या स्मृतिदिनाच्या निम्मिताने महाविद्यालयामध्ये जिमखाना विभागाच्या वतीने महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या बॅडमिंटन स्पर्धेसाठी एकूण ६० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेमध्ये मुलीं व मुलांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे वैष्णवी दीपक गायकवाड, प्रज्ञा मंगेश कोलते, अपर्णा मंगेश कोलते व तेजस सीताराम रानवसे, प्रसाद प्रमोद जैतापकर, रमाकांत अशोक शिंगरे यांनी पटकावला. या विजेत्या स्पर्धकांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमासाठी महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे स्थानिक समिति अध्यक्ष श्री. सज्जनकाका रावराणे, संस्थेचे सचिव श्री.शैलेंद्र रावराणे, सहसचिव श्री.विजय रावराणे उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, अधीक्षक, जिमखाना विभाग प्रमुख, प्राद्यापक, शिक्षेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख प्रा. सचिन पाटील यांनी केले तर आभार सदस्य किरण पाटील यांनी मांडले.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संजीवनी पाटील यांनी केले.