कोटकामते येथे रुग्णवाहिका अर्पण सोहळा उत्साहात संपन्न.

कोटकामते येथे रुग्णवाहिका अर्पण सोहळा उत्साहात संपन्न.

देवगड.

   कोरोनासारख्या महामारीत आरोग्य विषयक गोष्टींची किती आवश्यकता आहे हे या काळात लोकांना समजले त्यातीलच महत्त्वाचा भाग म्हणजे रुग्णांना नेआण करण्यासाठी लागणारी रुग्णवाहिका, इनामदार श्री देवी भगवती संस्थान, कोटकामते यांच्या मार्फत रुग्णवाहिकेसाठी देणगीकरीता सामाजिक आवाहन देवी भगवतीच्या भक्तांना करण्यात आले होते.या आवाहनाला साद देत निस्वार्थ भावनेने देवी भक्त श्री आनंद तानवडे यांनी कृष्णाबाई शंकर ( मास्तर ) तानवडे आणि निता तानवडे यांच्या नावे आई श्री.देवी भगवती चरणी अर्पण केली. हे सामाजिक कार्य यशस्वी करण्यासाठी नाना तानवडे यांनी विशेष मेहनत घेऊन या सामाजिक कार्यात अत्यंत महत्त्वाचे सहकार्य केले.या रुग्णवाहीकेचा अर्पण सोहळा दिनांक 26 मे 2024 रोजी श्री देवी भगवती मंदिर कोटकामते येथे उत्साहात पार पडला.
   या सोहळ्याला कोटकामते ग्रामस्थ, देवी भगवतीची भक्त मंडळी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. यात देवस्थानचे आजी व माजी विश्वस्त, श्री देव कुणकेश्वर ट्रस्ट अध्यक्ष श्री संतोष लब्दे, सदस्य श्री संजय आचरेकर, कोटकामते गावचे सुपुत्र नौसेना अधिकारी मंगेश दळवी, कोटकामते ग्रामपंचायत सरपंच सौ.ऋतुजा खाजणवाडकर, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष तुकाराम राऊळ, खुडी सरपंच दीपक कदम, डॉ.सुशांत माणगावकर, सोसायटी चेअरमन संजीव मेजारी आदी मान्यवर उपस्थित होते.