तिमाही ई आर १ विवरणपत्र ३१ ऑक्टोबरपर्यंत भरावे : प्र.सहायक आयुक्त ग.पा.चिमणकर.

तिमाही ई आर १ विवरणपत्र ३१ ऑक्टोबरपर्यंत भरावे : प्र.सहायक आयुक्त ग.पा.चिमणकर.

सिंधुदुर्ग.

   जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाचे मनुष्यबळाचे सप्टेंबर 2023 या तिमाहीचे ई आर 1 हे विवरणपत्र 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत https://rojgar.mahaswayam.gov.in  या वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने भरावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदशन केंद्राचे, प्र.सहायक आयुक्त ग.पा. चिमणकर यांनी केले आहे.
   सेवायोजन कार्यालये (रिक्त पदे अधिसूचित करणे सक्तीचे) कायदा 1959 अन्यवे कलम 5 मधील तरतुदीनुसार शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थानेत काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माहितीचे तिमाही विवरणपत्र ई आर-1 प्रत्येक तिमाही संपल्यावर 30 दिवसाचे आत सादर करणे  आस्थापनेस बंधनकारक आहे. त्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने विकसित केलेल्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने भरावे. दिनांक 30 सप्टेंबर 2023 रोजी संपलेल्या तिमाईचे विवरणपत्र ई आर -1 वेबसाईटवर दि. 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने भरावे. ज्या उद्योजक, आस्थापना यांना ऑनलाईनव्दारे विवरणपत्र भरण्यास अडचणी येत असतील अशांनी या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02362- 228835 वर संपर्क साधावा.