सावंतवाडीत बोटींग क्लब लवकरच सुरू होणार

सावंतवाडीत बोटींग क्लब लवकरच सुरू होणार

सावंतवाडी
   सावंतवाडी मध्ये पर्यटकांसह सावंतवाडीकरांसाठी
आणखी ६ बोटी दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे या बोटी बदकाच्या आकाराच्या आहेत. त्यामुळे आता परिपुर्ण बोटींग क्लब लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. माजी मंत्री तथा रत्नसिंधू योजनेचे अध्यक्ष दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी पालिकेच्या माध्यमातून मोती तलावात पुन्हा एकदा बोटींग क्लब सुरू केला जात आहे. या पार्श्वभूमीवर या आधी चार बोटी आणल्या होत्या. यात दोन पॅडलच्या तर दोन मशीनच्या बोटचा समावेश होता. दरम्यान या बोटीत आणखी नव्याने भर पडली असून नव्याने सहा बोटी बदकाच्या आकाराच्या आणण्यात आल्या आहेत. लवकरच हा बोटींग क्लब सुरू करण्याचा पालिका प्रशासनाचा मानस आहे, असे पालिकेकडुन सांगण्यात आले.