सेंट्रल इंग्लिश स्कूलचे गणित संबोध परीक्षेत उज्वल यश.

सेंट्रल इंग्लिश स्कूलचे गणित संबोध परीक्षेत उज्वल यश.

सावंतवाडी.

   सावंतवाडी मर्कझी जमात बॉम्बे संचलित सेंट्रल इंग्लिश स्कूलने गणित संबोध परीक्षेत उज्वल यश मिळवले आहे. या परीक्षेत इ. ५ वी तील ५ विद्यार्थी व इ. ८ वी तील ०९ विद्यार्थी असे एकुण १४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.
   या परीक्षेत विशेष प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झालेले इ. ५ वी तील कु.सना शहानवाज नेसर्गी कु. आयान अजरूद्दीन नैसर्गी मलिक नदाफ, कु अथर्व प्रशांत निंबाळकर, कु. मुआज कु. असद सय्यदसहाब दर्गावाले व ८ वी तील कु. फायजा अनिस बागवान, कु . सारा इफ्तेखार बेग, कु. फिदा जहीर अब्बास शेख, कु मिस्बा कु जमिरुद्दीन शाह, कु . हुमेरा मुझफ्फर मिर्झा, कु. मोहम्मद साहिल इक्बाल नाईक कु. अब्दुलसत्तार इकबाल नाईक, कु. भागवती कुमारी बिजलाराम, कु. रिझा अल्ताफ बेग, इ. विद्यार्थी पुढील गणित प्राविण्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. या विद्यार्थांना प्रशालेतील शिक्षिका श्रीम. फिरदोस ख्वाजा व श्रीम. सिद्धी गोसावी यांनी मार्गदर्शन केले.
   सावंतवाडी मर्कझी जमात, बॉम्बे संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ, पर्यवेक्षिका श्रीम. मारिया पिंटो, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्याथ्यांचे कौतुक केले व पुढील गणित प्राविण्य परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.