वेंगुर्ला येथे १६ ते १८ नोव्हेंबर कालावधीत 'दिपावली शो टाईमचे' आयोजन.

वेंगुर्ला येथे १६ ते १८ नोव्हेंबर कालावधीत 'दिपावली शो टाईमचे' आयोजन.

वेंगुर्ला.

   वेंगुर्ला बाजारपेठ मित्रमंडळ आणि वेंगुर्ला शहर शिवसेनातर्फे १६ ते १८ नोव्हेंबर कालावधीत गाडीअड्डा नाका येथे रात्रौ ८ ते ११ वाजेपर्यंत दिपावली शो टाईमचे आयोजन केले आहे.
   दि. १६ रोजी १० वर्षावरील वयोगटासाठी रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार आहे. याची नावनोंदणी स्वप्नील पांडजी (९९२३९२०८२३) यांच्याकडे करावी. दि. १७ रोजी महिलांसाठी विशेष खास खेळ पैठणीचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. तर दि. १८ रोजी ओमी डान्स अकॅडेमी प्रस्तुत 'नटरंग' हा हिंदी-मराठी बहारदार नृत्याचा नजराणा असणार आहे. यात स्वामी समर्थ दर्शन, साईबाबा दर्शन, शिवाजी महाराज राज्याभिषेक, श्री देव वेतोबा दर्शन दाखविण्यात येणार आहे.तरी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.