अविनाश साबळेने रचला इतिहास, ३,००० मीटर स्टीपलचेस अंतिम फेरीत पोहोचणारा ठरला पहिला भारतीय. ७ ऑगस्टला होणार अंतिम फेरी.

अविनाश साबळेने रचला इतिहास, ३,००० मीटर स्टीपलचेस अंतिम फेरीत पोहोचणारा ठरला पहिला भारतीय.  ७ ऑगस्टला होणार अंतिम फेरी.

पॅरिस.

   पॅरिस ऑलम्पिकमध्ये भारतीय खेळाडू आपली दमदार कामगिरी दाखवत आहेत. आतापर्यंत भारताला तीन कांस्यपदक मिळाले आहेत. भारताला खात्यात आणखी एका पदाची भर पडणार आहे. पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धेत बीडच्या अविनाश साबळेने अंतिम फेरीत धडक मारली आहे. विशेष म्हणजे अविनाश ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेसच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय ठरला आहे.
   अविनाश पाचव्या क्रमांकावर राहून पात्र ठरला. अविनाश साबळेनं ८ मिनिट १५.४३ सेकंदात पात्रता फेरी पूर्ण करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. तर मोरोक्कोच्या मोहम्मद टिंडौफतने ८ मिनिटे १०.६२ सेकंद अशी सर्वोत्तम कामगिरी करत अव्वल क्रमांक पटकावले. ७ ऑगस्ट अंतिम फायनल असणार आहे.