चौकेकरवाडी दिवाळी उत्सव २०२५ उत्साहात संपन्न

चौकेकरवाडी दिवाळी उत्सव २०२५ उत्साहात संपन्न

 

सावंतवाडी

 

       सावंतवाडी येथील चौकेकरवाडी आयोजित दिवाळी पडवा निमित्त दिवाळी उत्सव २०२५ मोठ्या उत्साहात आणि उत्स्फूर्त सहभागात संपन्न झाला. दोन दिवसांच्या या भव्य कार्यक्रमास ग्रामस्थांचा तसेच युवक-वर्ग आणि महिला बांधवांचा मोठा प्रतिसाद लाभला.कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख व न्हावेली उपसरपंच अक्षय पार्सेकर, प्रशांत साटेलकर, आशिष झाटये, निखिल कुडव, कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.दिवस पहिल्या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, पाककला स्पर्धा, खाद्य संस्कृती शॉर्टी, नृत्य स्पर्धा यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तर रात्रीच्या सत्रात झालेल्या डीजे नाईटने तरुणाईला मंत्रमुग्ध केले.दुसऱ्या दिवशी झालेल्या पारंपरिक व आधुनिक फुगड्यांच्या स्पर्धेने वातावरण रंगून गेले. दोन्ही दिवशी आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे उत्कृष्ट व संयत निवेदन ञिंबक आजगावकर (गुरुजी), वामन राऊळ आणि आदित्य निर्गुण यांनी करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.या दोन दिवसांच्या दिवाळी उत्सवाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि चौकेकरवाडी दिवाळी उत्सव २०२५ अत्यंत यशस्वीरीत्या संपन्न झाला.