उच्च ध्येय गाठण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि योग्य नियोजन केल्यास यश निश्चित : डॉ.महेश अभ्यंकर.
कणकवली.
शिक्षण प्रसारक मंडळाचे कणकवली कॉलेज कणकवली संचलित 'केशवप्रभा अकादमी' आयोजित विविध प्रवेश पात्रता परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमांमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.महेश अभ्यंकर हे बोलत होते.
कणकवली कॉलेज च्या एचपीसीएल हॉलमध्ये 28 जुलै रोजी सकाळी 10 ते 1.30 या वेळेत आयोजित कार्यक्रमात संस्थेच्या चेअरमन आणि कार्यक्रमाचे अध्यक्षा डॉ. सौ राजश्री साळुंखे, विशेष विकास अधिकारी डॉ. संदीप साळुंखे हे उपस्थित होते. सिंधुदुर्गचे सुपुत्र मालवण येथील व मुंबईचे प्रसिद्ध डॉक्टर आणि लोकमत चेंज मेकर 2023 अवॉर्ड प्राप्त डॉ. महेश अभ्यंकर यांनी कणकवली कॉलेज येथील विज्ञान शाखेतील आणि विद्यामंदिर हायस्कूल इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना व पालकांना जेईई व नीट परीक्षा या संदर्भात मार्गदर्शन केले. मार्गदर्शनामध्ये डॉ. अभ्यंकर यांनी जेईई परीक्षा व नीट परीक्षा या परीक्षांच्या अभ्यासाचे नियोजन, वेळेचे नियोजन तसेच या परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी अनेक मूलमंत्र दिले. उच्च ध्येय प्राप्त करावयाचे असल्यास योग्य वेळी योग्य मार्गदर्शन आणि योग्य नियोजन केल्यास यश निश्चितच प्राप्त होते. सदर कार्यक्रमात एकूण 250 विद्यार्थ्यांनी मार्गदर्शनाचा लाभ घेतला. या कार्यक्रमात प्राचार्य प्रा. युवराज महालिंगे, पर्यवेक्षक प्रा. ए.पी. चव्हाण, विज्ञान विभागातील सर्व शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. के.जी. जाधवर यानी केले. प्राआर. आर. अमृते यानी प्रमुख पाहुण्याचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुषमा हरकुळकर व आभार प्रदर्शन प्रा. एम के माने यांनी केले.