न्हावेली येथील भजन स्पर्धेत श्री देव हेळेकर भजन मंडळ प्रथम

न्हावेली येथील भजन स्पर्धेत श्री देव हेळेकर भजन मंडळ प्रथम

 

सावंतवाडी

 


  श्री देवी भवानी मंदिर,न्हावेली रेवटेवाडी येथे नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय निमंत्रित नवोदित भजन स्पर्धेत कारिवडेचे श्री देव हेळेकर प्रासादिक भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला.द्वितीय क्रमांक मळेवाडचे श्री मुसळेश्वर प्रासादिक भजन मंडळ, तृतीय क्रमांक दांडेलीचे श्री देव दाडोबा प्रासादिक भजन मंडळ, उत्तेजनार्थ क्रमांक स्वयंभू रामेश्वर प्रासादिक भजन मंडळ व शिस्तबद्ध संघ दांडेलीचे श्री देव दाडोबा प्रासादिक भजन मंडळाने मिळवला.

 

उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे

उत्कृष्ट हार्मोनियम प्रथमेश गावडे ( श्री भूतनाथ प्रासादिक भजन मंडळ,निरवडे), उत्कृष्ट गायक संतोष संतोष सावंत (श्री देव हेळेकर प्रासादिक भजन मंडळ,कारिवडे ) उत्कृष्ट पखवाज निहाल उक्षेकर(श्री मुसळेश्वर प्रासादिक भजन मंडळ,मळेवाड) उत्कृष्ट तबला मंहत नेमण(गुरुकृपा प्रासादिक भजन मंडळ,न्हावेली घोडेमुख), उत्कृष्ट झांजवादक भावेश परब ( कुलदेवता प्रासादिक भजन मंडळ,घोडेमुख),उत्कृष्ट देवीचा गजर(कुलदेवता प्रासादिक भजन मंडळ, घोडेमुख), उत्कृष्ट कोरस (गुरुकृपा प्रासादिक भजन मंडळ,न्हावेली घोडेमुख) यांची निवड करण्यात आली. स्पर्धेतील प्रथम चार क्रमांकाना ५००० रुपये, द्वितीय ३००० रुपये, तृतीय २००० रुपये, उत्तेजनार्थ १००० रुपये तसेच गायक, हार्मोनियम, पखवाज, तबला, देवीचा गजर, कोरस अशी प्रत्येकी वैयक्तिक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.या स्पर्धेत एकूण आठ भजन संघानी सहभाग घेतला होता. परिक्षक म्हणून महेंद्र पिंगुळकर(निवजे) व अमेय गावडे (पाडलोस) यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन प्रसाद आडेलकर यांनी केले.