अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर मोठा हल्ला!.......१२ पाकिस्तानी सैनिक ठार; अनेक लष्करी चौक्या अफगाण सैन्याच्या ताब्यात!

अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर मोठा हल्ला!.......१२ पाकिस्तानी सैनिक ठार; अनेक लष्करी चौक्या अफगाण सैन्याच्या ताब्यात!

 

अफगाणिस्तान

 

       अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवर जोरदार युद्ध सुरू असल्याचे वृत्त आहे. शनिवारी रात्री नांगरहार आणि कुनार प्रांतातील डुरंड रेषेजवळील पाकिस्तानी लष्करी चौक्यांवर अफगाणिस्तानने जोरदार हल्ले केले.हल्ल्यांमध्ये १२ पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचे समजते आहे.एवढेच नाही तर अफगाण सैन्याने अनेक पाकिस्तानी चौक्या ताब्यात घेतल्याची माहितीही समोर येत आहे. अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी भारताच्या दौऱ्यावर असताना ही लढाई सुरू झाली आहे. मुत्तकी यांचा भारत दौरा सुरू झाला तेव्हा पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला होता.अफगाणिस्तान सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने टोलो न्यूजला सांगितले की अफगाणिस्तानच्या सैन्याने कुनार आणि हेलमंड प्रांतात अनेक पाकिस्तानी चौक्या ताब्यात घेतल्या आहेत आणि प्रत्येकी एक उद्ध्वस्त केली आहे. स्थानिक सूत्रांनुसार, पक्तिया प्रांतातील रब जाजी जिल्ह्यात अफगाण सीमा दल आणि पाकिस्तानी सैन्यात तीव्र लढाई सुरू झाली आहे. टोलो न्यूजनुसार, आतापर्यंत या लढाईत पाच पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत आणि दोन जण जखमी झाले आहेत.या लढाईत पाकिस्तानी सैन्याचे मोठे नुकसान झाले आहे. अफगाणिस्तानच्या सैन्याने पाकिस्तानी सैनिकांकडून शस्त्रेही जप्त केली आहेत. स्पिना शागा, गिवी, मनी जाभा आणि इतर भागात लढाई सुरू आहे, जिथे हलकी आणि जड शस्त्रे वापरली जात आहेत. ९ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानने अफगाणिस्ताना तील काबूल, खोस्त, जलालाबाद आणि पक्तिका येथे अनेक हवाई हल्ले केले, ज्यात टीटीपी प्रमुख नूर वली मेहसूद यांना लक्ष्य केले. दरम्यान, इस्लामाबादमधील रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, शनिवारी रात्री पाकिस्तान- अफगाणिस्तान सीमेवर गोळीबार झाला. अफगाण सैन्याने पाकिस्तानी लष्करी चौक्यांवर हल्ला केला. पाकिस्तानी सुरक्षा अधिकाऱ्यांनी सीमेवरील पाचपेक्षा जास्त ठिकाणी झालेल्या चकमकींची पुष्टी केली आणि ते प्रत्युत्तर देत असल्याचे सांगितले. दक्षिण अफगाणिस्तानच्या हेलमंड प्रांतातील स्थानिक अधिकाऱ्यांच्या मते, तालिबानी सैन्याने दोन पाकिस्तानी सीमा चौक्या ताब्यात घेतल्या. दरम्यान, पाकिस्तानने हवाई हल्ल्यांना पुष्टी किंवा नकार दिलेला नाही.