केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये शेतकरी आणि कृषीसाठी १.५२ लाख कोटींची तरतूद; शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा.

केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये शेतकरी आणि कृषीसाठी १.५२ लाख कोटींची तरतूद; शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा.

नवीदिल्ली.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या अर्थसंकल्पाची प्रतीक्षा सर्वांनाच उत्सुकता होती. आज आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचा देशाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट देण्यात आलंय. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली आहे. शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात १.५२ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून कृषी आणि संबंधित क्षेत्रासाठी योजना तयार करण्यात येणार आहेत.
   अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज कृषी क्षेत्रातील उत्पादकता आणि लवचिकता वाढविण्यासाठी योजनेची घोषणा केलीय. सीतारामन यांनी, कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी १.५२ लाख कोटींची घोषणा केलीय. त्यांनी सांगितलं की, सरकार देशात राष्ट्रीय सहकार धोरण आणणार आहे. त्यासोबतच भाज्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी क्लस्टर योजना देखील आणणार आहे. अर्थसंकल्पात शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी १.५२ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय. या निधीमधून कृषी आणि संबंधित क्षेत्रासाठी योजना तयार करण्यात येणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे. ३२ पिकांसाठी १०९ जाती लाँच करणार आहेत. तर कृषी क्षेत्राच्या विकासाला प्रथम प्राधान्य येणार असल्याचं सीतारामन अर्थसंकल्पात मांडलं आहे. नैसर्गिक शेती वाढवण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय. हा अर्थसंकल्प गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यांच्यावर केंद्रित आहे.
   अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळासाठी अर्थसंकल्प सादर करत आहेत. भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून महागाई नियंत्रणात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सर्वप्रथम मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून दिल्याबद्दल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशवासीयांचे आभार मानले. गरीब, महिला, युवा आणि शेतकरी या चार समाजघटकांवर आपण लक्ष केंद्रीत करायला हवं. अंतरिम अर्थसंकल्पात आपण तेच केले असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. या अर्थसंकल्पात 9 घटकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. यात शेती क्षेत्रातील उत्पादकता, रोजगार व कौशल्य विकास, मनुष्यबळ विकास व सामाजिक न्याय, उत्पादन व सेवा, शहरी विकास, उर्जा संरक्षण, पायाभूत संरचना, संशोधन व विकास, नव्या पीढीतील सुधारणा आदींचा समावेश असून मोदी 3.0 सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.