दहावीचा निकाल आज दुपारी १ वाजता होणार जाहीर.

दहावीचा निकाल आज दुपारी १ वाजता होणार जाहीर.

पुणे.

   दहावीचा निकाल आज सोमवारी दु. १ वा. जाहीर होणार आहे. सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद पार पडेल. या पत्रकार परिषदेमध्ये बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी हे विभागीय टक्केवारी जाहीर करतील. त्यानंतर दुपारी एक वाजता प्रत्यक्षात विद्यार्थी आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहू शकणार आहेत.
   महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आज दहावीचा निकाल करणार आहे. या निकालाबाबत पालकांना उत्सुकता लागून होती. दरम्यान, महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी १ च्या दरम्यान, निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे. यामुळे पालकांचीही धाकधूक वाढली आहे. अकरावीची पूर्व प्रवेश प्रक्रिया देखील दोन दिवसांपूर्वी सुरू झाली आहे. यंदा दहावीची परीक्षा देणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या वर्षी १६ लाख ९ हजार ५४४ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नाव नोंदणी केली होती.
    आज निकाल लागणार असल्याने सर्व विद्यार्थ्यांसह पालकांचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटला भेट द्या. होमपेजवरील दहावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा. तुमच्या लॉगीन डिटेल्स, परीक्षा क्रमांक, आईचं नोंदवा. स्क्रीनवर तुमचा निकाल उपलब्ध होईपर्यंत थांबा. थोड्या वेळात तुमचं निकाल जाहीर होईल, निकाल मिळाल्यावर पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाऊनलोड करा किंवा अथवा त्याची छापील प्रत काढून घ्या. विद्यार्थ्यांना निकाल लागल्यावर मूळ छापील प्रत ही काही दिवसांनतर त्यांच्या शाळांमध्ये दिली जाणार आहे.