सावंतवाडी नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून साक्षी वंजारी यांनी भरला उमेदवारी अर्ज
सावंतवाडी
नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून आज जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी महाविकास आघाडी झालेली नाही. त्यामुळे आम्ही स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाऊ, आणि विकासाच्या मुद्द्द्यावर विकासाचे व्हिजन ठेवून निश्चितच निवडून येऊ, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. काँग्रेसच्या माध्यमातून इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरण्यात आले. त्यानंतर सौ. वंजारी या पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी त्या म्हणाल्या, पहिल्यांदाच महिला आरक्षण पडल्यामुळे थेट महिला नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करण्याची संधी मिळणार आहे. मी गेली अनेक वर्षे राजकारणात आणि सामाजिक कामात पुढाकार घेत असल्यामुळे मी या ठिकाणी इच्छुक आहे. येणाऱ्या काळात विकासाच्या मुद्द्द्यावर आम्ही निवडणुकीला सामोरे जाणारा आहोत. भ्रष्टाचारमुक्त नगरपरिषद आणि विकास हे दोन आमचे प्रमुख मुद्दे असणार आहेत. यावेळी त्या पुढे म्हणाल्या, या ठिकाणी ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर लढा, असे सांगितल्यामुळे या ठिकाणी महाविकास आघाडी होणार नाही. आमचे सर्व नगरसेवक हे उच्चशिक्षित आणि नवीन चेहरे आहेत. त्यामुळे येथील जनता आम्हाला निश्चितच निवडून सभागृहात पाठवेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी शक्तीप्रदर्शन करत काँग्रेसच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर, तालुकाध्यक्ष अभय मालवणकर आदी उपस्थित होते. यावेळी सुनील पेडणेकर, अरूण भिसे, ॲड. राघवेंद्र नार्वेकर, समीर वंजारी, तौकीर शेख, बाळा नमशी आदींनी आपले अर्ज दाखल केले.

konkansamwad 
