परुळे येथे राधारंग फाउंडेशन पुरस्कृत संगीतकार वसंत देसाई स्मृती गायन स्पर्धा
परुळे
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारी राधारंग फाउंडेशन या संस्थेकडून दरवर्षी गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी सिंधुदुर्गचे सुपुत्र सुप्रसिद्ध संगीतकार कै. वसंत देसाई यांच्या ५० व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून राधारंग फाउंडेशनने गायन स्पर्धेचे आयोजन केले गेले आहे.स्पर्धेचा तपशील खालील प्रमाणे
पारितोषिके
प्रथम क्रमांक –रु. ३००० आणि स्मृतिचिन्ह
द्वितीय क्रमांक –रु. २५०० आणि स्मृतिचिन्ह
तृतीय क्रमांक –रु. २००० आणि स्मृतिचिन्ह
उत्तेजनार्थ –रु. १००० आणि स्मृतिचिन्ह
स्पर्धेचे नियम
या स्पर्धेत १८ वर्षावरील स्त्री पुरुष सहभागी होऊ शकतात.ही स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरती मर्यादित आहे.
या स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही.या स्पर्धेत वसंत देसाई यांचे कोणतेही मराठी गीत सादर करायचे आहे
दि.२० डिसेंबर २०२५ पर्यंत प्रथम नाव नोंदणी करणा-या १५ स्पर्धकांची स्पर्धेसाठी निवड करण्यात येईल. स्पर्धकाने येताना वयाचा पुरावा (ओळखपत्र,आधारकार्ड) आणणे आवश्यक आहे. पुरावा नसल्यास किंवा वयोगटात बसत नसल्यास स्पर्धेतील प्रवेश रद्द करण्यात येइल.संगीत साथ आयोजकांकडून उपलब्ध करून देण्यात येईल. गीत सादरीकरणाचा वेळ ५ ते ७ मिनिटांचा राहील. परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
अधिक माहीतीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क क्रमांक
डॉ.प्रशांत सामंत ९४२३३१८२३१
ही स्पर्धा सोमवार दि.२९ डिसेंबर २०२५ रोजी सायं. ६. ३० वा. श्री देव आदिनारायण मंदिर परुळे येथे होईल. या स्पर्धेचे आयोजन स्वरयोग मुंबई आणि परुळे युवक कला क्रीडा मंडळाने केले असून स्पर्धेच्या परीक्षणासाठी सुप्रसिद्ध ॲकॉर्डियन श्री. सुराज साठे आणि श्री. प्रदीप देसाई हे परीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच सुप्रसिद्ध गायिका फैयाज यांच्या हस्ते उदघाटन व बक्षीस वितरण होणार आहे.

konkansamwad 
