डाक विभागामार्फत जिल्ह्यात ९ ऑक्टोंबर पासुन डाक सप्ताह.

डाक विभागामार्फत जिल्ह्यात ९ ऑक्टोंबर पासुन डाक सप्ताह.

सिंधुदुर्ग.

   भारतीय डाक विभागातर्फे येत्या 9 आक्टोबर ते 13 आक्टोबर 2023 या कालावधीमध्ये राष्ट्रीय डाक सप्ताह साजरा केला जाणार आहे. या अनुषंगाने सिंधुदुर्ग डाक विभागात 9 आक्टोबर हा "जागतिक टपाल दिन' साजरा करून या सप्ताहाची सुरुवात केली जाणार आहे.
  या सप्ताहाच्या अनुषंगाने डाक विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजना व बचत योजनांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी वेगवेगळे दिवस साजरे करून या योजनांचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार डाक विभागातर्फे केला जाणार आहे.
   या वर्षीच्या जागतिक टपाल दिनाची थीम " TOGETHER FOR TRUST" म्हणजेच "विश्वासासाठी एकत्र" अशी आहे. या वर्षीचा डाक सप्ताह अधिक नाविन्यपूर्ण उपक्रम आणि कार्यक्रम राबवून साजरा केला जाणार आहे. यात सिंधुदुर्ग विभागामार्फत “डाक सामुदायिक विकास कार्यक्रम" अंतर्गत पोस्टाच्या सर्व सेवा व सुविधा एकाच दिवशी एकाच ठिकाणी नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष "डाक- चावडी (DCDP Camp) चे आयोजन केले जाणार आहे. यासाठी सिंधुदुर्ग डाक विभाग पूर्णपणे सज्ज असुन यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन विभागामार्फत करण्यात आले आहे.
  मागील काही वर्षात अनेक नवनवीन योजना डाक विभागामार्फत राबविल्या जात आहेत. यात बचत बँक, डाक जीवन वीमा योजनांचे संगणकीकरण, इंडीया पोस्ट पेमेंट बँक, आधार सेवा, कॉमन सर्व्हिस सेंटर, महिला सन्मान योजना, आधार इनेबल पेमेंट सर्व्हिस अशा विविध योजना व सुविधा नव्याने राबविल्या जात आहेत. सोबतच ग्रामीण भागातील पोस्ट ऑफिसच्या सेवा अधिक सुलभ करण्यासाठी नुकतेच जिल्ह्यातील सर्व 316 ग्रामीण टपाल कार्यालये दर्पण 2.0 मध्ये रोल आऊट करण्यात आली असुन, सर्व ग्रामीण टपाल कार्यालये संपूर्णपने ऑनलाईन करण्यात आली आहेत. अशी माहिती सिंधुदुर्ग डाक विभागाचे अधिक्षक श्री. मयुरेश कोले यांनी दिली. तसेच डाक विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या या योजनांचा व राष्ट्रीय डाक सप्ताहाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त जनतेने सहभागी होऊन याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.