नेरुळ येथील आयडियन इंग्लिश मीडियम इको स्कूलचा आदर्श अन्य शाळांनी घ्यावा ; प्रा. खानोलकर

नेरुळ येथील आयडियन इंग्लिश मीडियम इको स्कूलचा आदर्श अन्य शाळांनी घ्यावा ;  प्रा. खानोलकर


    नेरुळ येथील आयडियल इंग्लिश मीडियम इको स्कूलमध्ये वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वेशभूषा स्पर्धेला पर्यावरणाशी सांगड घालत जैवविविधतेचे संवर्धन रक्षण या विषयावर संपन्न झालेल्या आगळ्यावेगळ्या वेशभूषा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी केलेले पर्यावरण आणि जैवविविधतेचे घडलेल्या दर्शन निश्चितच कौतुकास्पद आहे. या उपक्रमाचा आदर्श इतर शाळांनी घ्यावा असा विचार प्रा वैभव खानोलकर यांनी यावेळी मांडला. 
    या स्पर्धेचे परीक्षण लोककला अभ्यासक युवा व्याख्याते आणि सुप्रसिद्ध निवेदक मुलाखतकार प्रा वैभव खानोलकर यांनी केले. ही स्पर्धा एकूण सहा गटात घेण्यात आली. यामध्ये नर्सरी गटात सुर्वी सावंत प्रथम तर द्वितीय जिजा गुरव, तृतीय प्रज्ञेश नाईक यांनी बाजी मारली. ज्युनियर केजी गटात मानवी परब प्रथम, सुरेश पालेकर द्वितीय आणि तृतीय दिगंबर हळदणकर. सीनियर केजी मध्ये प्रथम ओवी प्रभूकेळकर, द्वितीय विहान सरमळकर आणि तृतीय मीरा कदम. पहिली दुसरी गटात प्रथम अद्वैत चव्हाण, द्वितीय सौम्या मटकर, तृतीय सौम्या चौधरी, तिसरी चौथी गटात दिशा राहुल प्रथम, द्वितीय शनाया कचरेकर, तृतीय यज्ञेश पारकर, पाचवी सहावी गटात प्रथम संस्कृती शर्मा, द्वितीय अनुरा चौधरी, तृतीय महादेव कलिंगड यांनी यश मिळवले. 
    ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सौरभ पाटकर यांच्यासह चैतन्य चव्हाण, योगिता भाडदळकर, भूषण सारंग, वैभव अखेरकर, कीर्ती गावडे, श्रद्धा गोसावी, प्रतीक्षा दळवी, भक्ती फोंडेकर, कीर्ती चव्हाण, मिलिंद नाईक, अपर्णा मापनकर, वैभव आखेरकर यांनी हा उपक्रम राबवण्यासाठी मेहनत घेतले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोही तारे यांनी केले. 
  पारितोषिक वितरण प्रसंगी व्यासपीठावर चेअरमन डॉक्टर नंदिनी देशमुख, खजिनदार राजीव नेरुळकर तसेच मिलिंद नाईक आणि मुख्याध्यापक सौरभ पाटकर यावेळी उपस्थित होते.