सावंतवाडी येथे भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धाराजे भोंसले यांनी भरला उमेदवारी अर्ज
सावंतवाडी
सावंतवाडी नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपा कडून नगराध्यक्ष पदासह एकूण १५ उमेदवारांनी रविवारी उमेदवारी अर्ज दाखल केले.यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धा सावंत भोसले, भाजपचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोंसले, शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे, सौ. वेदिका परब, ॲड. अनिल निरवडेकर, मनोज नाईक, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक राजू बेग, उदय नाईक, दिलीप भालेकर, अमेय पै, मेघना राऊळ, वेदिका सावंत, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत भाजपकडून विजयाचा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढत असून सावंतवाडीचा विकास आणि शहराचा कायापालट नजरेसमोर ठेवून आपण निवडणुकीला सामोरे जात आहोत. शहरात असलेल्या समस्या सोडविण्यासाठी भाजपची सत्ता असण आवश्यक आहे, असे भाजपकडून सांगण्यात आले.
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धा सावंत भोसले यांनी श्री देव पाटेकर आणि उपरलकर देवाचा आशीर्वाद घेऊन अर्ज दाखल केल्याचे सांगितले.
श्रद्धाराजे भोसले म्हणाल्या, "आम्हाला सावंतवाडी विकसित करायची आहे. सावंतवाडीला 'सुंदरवाडी' करायची आहे. महिलांसाठी सुरक्षा, कचरा व्यवस्थापन आणि रोजगार निर्मितीवर माझा विशेष भर राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी भाजपचे नगरसेवक पदाचे उमेदवारांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केले.

konkansamwad 
