वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत जागतिक योग दिवस साजरा.

वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत जागतिक योग दिवस साजरा.

वेंगुर्ला.

  'जागतिक योग दिवस' हा दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. २१ जून २०१५ साली पहिल्यांदा जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. योग हा व्यायामाचा एक असा प्रभावशाली प्रकार आहे ज्याच्या माध्यमातून केवळ शरीराच्या विविध अवयवांमधीलच नाही तर मनाचेही संतुलन राखले जाते. योगाभ्यासामुळे शारीरिक व्याधी बरोबरच मानसिक विकारावर सुद्धा विजय मिळवता येऊ शकतो. अलीकडेच सामान्य नागरीकांमध्ये स्वस्थ, निरोगी, शांततापूर्ण जीवन जगण्यासाठी योगाभ्यासाचे महत्त्व वाढत आहे. सध्‍याच्या धावपळीच्‍या  जीवनशैलीमध्ये मनःशांती टिकवून ठेवण्याचा सुरक्षित आणि सोपा मार्ग म्हणजे योग. दर दिवशी नियमित योगाभ्यास केल्याने शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होऊन अंतर्बाह्य आराम मिळतो. योगातील विविध आसना मधून मानसिक आणि शारीरिक संतुलन राखले जाते. योगाभ्यासातून बौद्धिक पातळी सुधारते आणि आपण भावना स्थिर ठेवून एकाग्र होऊ शकतो. योगाभ्यासातून स्व-अनुशासन साधले जाते. 
वेंगुर्ला नगरपरिषद वेंगुर्ला,सिंधुदुर्ग योग प्रसार संस्‍था,सिंधुदुर्ग व डॉ. वसुधाज योगा अँड फिटनेस अॅकडॅमी यांच्‍या संयुक्‍त विदयमाने दिनांक २१ जून २०२४ रोजी वेंगुर्ला नगरप‍रिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात जागतिक योग  दिवस साजरा करण्‍यात आला. श्रीम. लीना यरनाळकर, मुख्‍याधिकारी श्री. परितोष कंकाळ, डॉ. वसुधा मोरे, श्रीम. संगीता कुबल व श्री. रामा पोळजी यांच्‍या  हस्‍ते दीपप्रज्‍वलाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्‍यात आली. तद्नंतर डॉ. वसुधा मोरे व श्रीम. लीना यरनाळकर यांनी आपली मनोगत व्‍यक्‍त केली.

योग दिवसाची उद्दिष्टे-

योगाभ्यासाच्या अद्भुत आणि प्राकृतिक फायद्यांबद्दल लोकांना माहिती उपलब्ध करुन देणे.

योगाच्या माध्यमातून लोकांना ध्यानधारणेची सवय लावणे.
 योगसाधनेच्या फायद्यांबद्दल संपूर्ण जगातील माणसांचे लक्ष 

वेधून घेऊन लोकांमधील दुर्धर आजारांचे प्रमाण कमी करणे.

आपल्या व्यस्त वेळापत्रकातून आरोग्यासाठी एक दिवस काढून जनसमुदायाला एकमेकांच्या जवळ आणणे.

संपूर्ण विश्वामध्ये वृद्धी, विकास आणि शांती याचा प्रसार करणे.
 
लोकांमध्ये वैश्विक बंधुभाव जागवणे.

योगाभ्यासद्वारे तणावमुक्त जीवन जगण्यास मदत करणे.
 
लोकांना शारीरिक आणि मानसिक आजाराबद्दल जागरूक करणे आणि योगाच्या माध्यमातून त्यावर उपाय शोधणे.
 
मानसिक स्वास्थ्य जपून दीर्घकालीन स्वास्थ्य प्राप्त करणे.

योगाभ्यासातून लोकांना शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचा अनुभव देणे.

रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी आणि निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली म्हणून योगाला आपल्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान मिळावे यासाठी सर्वांनी आपल्‍या व्यस्त जीवनशैली मधून  किमान १ तास योगासाठी दयावा असे आवाहन मुख्‍याधिकारी परितोष कंकाळ यांनी  केले.