मसुरे केंद्रस्तरीय तृणधान्य पाककृती स्पर्धेत आदिती मेस्त्री प्रथम.

मसुरे केंद्रस्तरीय तृणधान्य पाककृती स्पर्धेत आदिती मेस्त्री प्रथम.

मालवण.

   प्रधानमंत्री पोषणशक्ती अभियानांतर्गत पालक व ग्रामस्थ यांच्यासाठी मसुरे केंद्रस्तरीय आयोजित तृणधान्य पाककृती स्पर्धेत देऊळवाडा प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती सदस्या आदिती अमोल मेस्त्री यांनी बनविलेल्या मिक्स तृणधान्याचे आप्पे या पाककृतीने प्रथम क्रमांक पटकावला.
   या स्पर्धेत मसुरे केंद्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या पालकांसह ग्रामस्थांनी सहभाग घेतला नाचणी, वरी, गहू, तांदूळ यासारख्या विविध धान्यांचा वापर करून शेवया, मोदक, लाडू, धपाटे आदी पदार्थ बनवून आकर्षक सजावटीसह त्यांची मांडणी केली होती. स्पर्धेचे परीक्षण मालवण गटसाधन केंद्राच्या विषयतज्ज्ञ आरती कांबळी व विकास रुपनर यांनी केले. केंद्रप्रमुख नारायण देशमुख, मुख्याध्यापिका शर्वरी सावंत, माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, शीतल मसुरकर व शिक्षक उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदानंद कबरे, मुख्याध्यापक प्रशांत पारकर आदींनी शुभेच्छा दिल्या.