करूळ घाट वाहतुकीसाठी पूर्ववत सुरू

वैभववाडी
दरड कोसळल्यामुळे बंद असलेला करूळ घाटमार्ग आजपासून वाहतूकीस पूर्ववत सुरू झाला आहे. त्या ठिकाणी रस्त्यावर आलेल्या दरडी बाजूला करण्यात आले असून त्यासाठी युद्धपातळीर काम करण्यात आले होते. आता हा रस्ता वाहतुकीस सुरळीत झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली. याबाबत प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली आहे. घाटात दरड कोसळल्यामुळे गेले काही दिवस हा महामार्ग बंद होता.