अखेर वीज कंत्राटी कामगार संघटनेच्या पाठपुरवठ्याला यश.

अखेर वीज कंत्राटी कामगार संघटनेच्या पाठपुरवठ्याला यश.

सिंधुदुर्ग.

   महावितरण कंत्राटी कर्मचारी तनय सावंत याचा १०.९.२०२३ रोजी लाईन वर काम असताना वेंगुर्ला रेडी येथे शॉक लागून मृत्यू झाला होता.सिंधुदुर्ग महावितरण मध्ये काम करत असणाऱ्या कंत्राटी कर्मचारी यांना कामगार राज्य विमा महामंडळ (ESIC) मार्फत अपघातात मृत्यू झाल्यास मयत कर्मचारी यांच्या कुटुंबीयांना पेन्शन चालू होते. यासाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे जिल्हा सचिव संजय गोवेकर,जिल्हाध्यक्ष आनंद लाड, ठेकेदार आरिफ तांबोळी यांनी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता.अखेर त्यांच्या पाठपुरवठ्याला यश आले. त्याप्रमाणे तनय सावंत यांची पत्नी श्रीम. दीप्ती तनय सावंत यांना हयात असू पर्यंत ११.९.२०२२ पासून प्रति दिन ३०३/- (मासिक ९०९०.००) तर मुलाचा जन्म २४.९.२०२३ ला झाल्यापासून मुलास  प्रति दिन २०२/- (मासिक ६०६०.००) २३.९.२०४७ (२५ वर्षे पूर्ण होईपर्यंत ) अशी एकूण १५१५०/- मासिक पेन्शन कामगार राज्य विमा महामंडळ यांच्याकडून चालू झाली आहे.