वेंगुर्ला मानसीश्वर खाडीत आढळलेल्या 'त्या' मृतदेहाची ओळख पटली

वेंगुर्ला
वेंगुर्ले येथील मानसीश्वर पुलानजीक खाडीकिनारी २९ जुलै रोजी ३६ वर्षीय तरूणाचा मृतदेह तरंगत्या अवस्थेत आढळून आला होता. संबंधित व्यक्ती कोण? याची पुष्टी अद्याप झाली नव्हती पण आता "त्या" मृतदेहाची ओळख पटली आहे. तो मृतदेह वेंगुर्ले कॅम्प-भटवाडी येथील विश्राम अरविंद सावंत याचा असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती वेंगुर्ले पोलीस ठाण्यातून देण्यात आली आहे. या प्रकरणी वेंगुर्ला पोलिस पुढचा तपास करत आहे.