विशाल परब यांचे भाजपाकडुन जल्लोषात स्वागत

विशाल परब यांचे भाजपाकडुन जल्लोषात स्वागत

 

सावंतवाडी

 

      भाजपात पुन्हा सक्रिय झालेल्या युवा नेते विशाल परब यांचे सावंतवाडी भाजपाच्या माध्यमातून जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संदिप गावडे, शहर अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, अजय गोंदावळे, मोहिनी मडगावकर आदींच्या माध्यमातून पुष्पहार घालून त्याचे स्वागत करण्यात आले.यावेळी ढोलताशाच्या गजरात बाईक रॅली झाराप तिठा ते सावंतवाडी काढण्यात आली. त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या सुहासीनींकडुन त्यांचे औक्षण करण्यात आले. यावेळी "भारतीय जनता पार्टीचा विजय असो...!!", "विशालभाई तुम आगे बढो..!!" अशा घोषणा कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या. यावेळी आता मी पुन्हा सक्रिय झालो असून पुन्हा एकदा संघटनावाढीसाठी प्रयत्न करणार आहे, असा शब्द त्यांनी उपस्थितांना दिला. यावेळी वेदिका परब, भार्गव परब, मनोज नाईक, आनंद नेवगी, संदीप गावडे, दिलीप भालेकर, ॲड. अनिल निरवडेकर, एकनाथ नाडकर्णी, अजय सावंत, दिपाली भालेकर, बाळा जाधव, सागर ठाकरे, अमित परब, रवींद्र परब, प्रसन्ना देसाई, विनोद राऊळ, संजू शिरोडकर, जितू गावकर, अनंत नाईक, विराग मडकईकर, मेघना साळगावकर, शमिका बांदेकर, मीना पांगम, रवीना नेवगी, श्रेया नेवगी आदी उपस्थित होते.