सिंधुदुर्ग काँग्रेस सेवा दल कार्याध्यक्ष पदी अजिंक्य गावडे यांची नियुक्ती

सिंधुदुर्ग काँग्रेस सेवा दल कार्याध्यक्ष पदी अजिंक्य गावडे यांची नियुक्ती

 

मुंबई

 

      वेंगुर्ला शिरोडा येथील अजिंक्य गावडे यांची सिंधुदुर्ग काँग्रेस सेवा दल कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र काँग्रेस सेवा दलचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांच्या हस्ते गावडे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे. यावेळी औताडे यांनी अजिंक्य गावडे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी विलास औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना जनसेवेला सर्वाधिक प्राधान्य देणार असल्याचे अजिंक्य गावडे यांनी सांगितले. तसेच, सिंधुदुर्ग काँग्रेस सेवा दल अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहीन असे आश्वासनही दिले.