करुळ घाटात कोसळली दरड, काही काळ वाहतूक झाली होती ठप्प

वैभववाडी
मुसळधार पडणाऱ्या पावसाचा फटका करुळ घाटाला बसला. शनिवारी सकाळी करूळ घाटात दरड कोसळल्याने एक तास वाहतूक ठप्प झाली होती. संबंधित यंत्रणेने दरड हटवून वाहतूक पूर्ववत केली आहे. वैभववाडी तालुक्यासह अनेक तालुक्यात जोरदार पाऊस कोसळत आहे.आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास करुळ घाटात दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. मार्ग बंद झाल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काही वाहन चालकाने दरड बाजूला करून मार्ग काढला होता. परंतु जेसीबीच्या सहाय्याने संबंधित यंत्रणेने रस्त्यात पडलेले दरड बाजूला केले. त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.