सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारणसाठी आरक्षित

सिंधुदुर्गनगरी
गेली साडेतीन वर्षे रखडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्याच्या निवडणुका घेण्याची तयारी सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शासनाने राज्यातील 34 जिल्हा परिषद अध्यक्षांचे आरक्षण जाहीर केले आहे. त्यात सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पुढील अडीज वर्षासाठी सर्वसाधारणसाठी आरक्षित झाले आहे. म्हणजेच खुले झाले आहे पंचायत समिती सभपतींचेही आरक्षण ठरवून देण्यात आले असून लवकरच तेही आरक्षण काढले जाणार आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणांचे आरक्षण काढले जाणार असून इच्छूकांचे या आरक्षण सोडतीकडे लक्ष लागून राहिले आहे.