धनगर समाज बांधवांनी टोकाचे पाऊल उचलू नये; सुशांत शेळके यांचे आवाहन.

धनगर समाज बांधवांनी टोकाचे पाऊल उचलू नये; सुशांत शेळके यांचे आवाहन.

वैभववाडी.

   महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे महाराष्ट्रातील सर्व जनतेचे मुख्यमंत्री आहेत ते कोणत्याही एका जाती धर्माचे नसून सर्वांना समान आहेत असे असून देखील मुख्यमंत्री मराठा समाजाच्या आंदोलनाला स्वतः जातात मात्र धनगर समाज्याच्या आंदोलनाला कुठेही दिसत नाही हा दुजेभाव का? असा सवाल धनगर समाज युवानेता सुशांत शेळके यांनी केला आहे.
  यावेळी धनगर धनगर समाज बांधवांनी टोकाचे पाऊल उचलू नये, आपली लढाई येथील प्रस्थापित राजकारणी व्यवस्थे विरुद्ध गेली ७० वर्षांपासून आहे.आपल्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत खचून न जाता शेवटपर्यंत लढण्याची तयारी ठेवा.आपल्याला ही लढाई नियोजन पद्धतीने लढावी लागणार आहे.येथील प्रस्थापितांना मतपेटीतून त्यांना त्यांची जागा दाखवा यासाठी सर्व समाज बांधवांनी एक ध्येयाने काम केले पाहिजे. येणाऱ्या निवडणुकीत आपले उमेदवार उभे करून निवडून आणल्यास न्याय मिळू शकतो यासाठी सर्वांनी एकत्र येवून ही लढाई लढणे गरजेचे आहे असे आवाहन धनगर समाज युवानेते सुशांत शेळके यांनी केला आहे.