वेंगुर्ले पोलीस ठाण्याच्या गणपतीचे पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतले दर्शन...

वेंगुर्ला
वेंगुर्ला पोलीस ठाण्यात पोलिसांच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या गणपती बाप्पाचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दर्शन घेतले. यावेळी १७ दिवसांच्या या गणरायाला पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी एकत्र येत रात्री उशिरा मिरवणुकीने मांडवी खाडीत विसर्जन केले.वेंगुर्ले येथील जनता दरबाराच्या कार्यक्रमासाठी पालकमंत्री नितेश राणे आले होते. त्यावेळी त्यांनी पोलीस ठाण्याला भेट देऊन गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, तालुकाध्यक्ष पप्पू परब यांच्यासह साईप्रसाद नाईक, नामदेव सरमळकर, संतोष सावंत आणि दादा केळुसकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी पालकमंत्री राणे यांचे स्वागत करत पोलीस ठाण्याच्या वतीने त्यांचा सत्कार केला. यावेळी पोलीस कर्मचारी मनोज परुळेकर, पांडुरंग खडपकर आणि पालकर यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. वेंगुर्ले पोलीस ठाण्यासमोर कार्यक्रमांसाठी सभा मंडपाची आवश्यकता असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले. यावर पालकमंत्र्यांनी तातडीने अंदाजपत्रक तयार करून देण्याचे सांगितले आणि त्यासाठी निधी मंजूर केला जाईल, असे आश्वासन दिले.