छत्रपती संभाजीनगरच्या तनिषा बोरमणीकर हिने बारावी परिक्षेत मिळवले १०० टक्के गुण; राज्यात पहिली येण्याचा मिळवला मान.

छत्रपती संभाजीनगरच्या तनिषा बोरमणीकर हिने बारावी परिक्षेत मिळवले १०० टक्के गुण; राज्यात पहिली येण्याचा मिळवला मान.

छत्रपती संभाजीनगर.

     महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचा आज निकाल जाहीर झाला आहे. देशभरातील अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. या परिक्षेत महाराष्ट्रातील संभाजी नगरच्या एका विद्यार्थिनीने १०० टक्के गुण मिळवले आहे. संभाजीनगरच्या तनिषा बोरमणीकर या विद्यार्थिनीने हे यश मिळवले आहे.
   तनिषा ही छत्रपती संभाजीनगरच्या देवगिरी कॉलेजमध्ये शिकत होती. बारावीच्या परिक्षेत १०० टक्के गुण मिळवणारी तनिषा ही एकमेव मुलगी आहे. तनिषाला १०० टक्के गुण मिळाल्याने तिच्या कुटुंबियांना खूप आनंद झाला आहे. तनिषाच्या शाळेच्या शिक्षकांनी देखील तिचे खूप कौतुक केले आहे. तनिषाने बोलताना सांगितले की, मला खरं तर ९५ टक्के मिळतील, अशी आशा होती. परंतु १०० टक्के मिळाल्याने मला खूप आनंद होत आहे. मी वर्षभर अकाउंट्स या विषयाचा अभ्यास केला. त्या विषयावर जास्त भर दिला.
   शेवटच्या दोन महिन्यात मी बाकीच्या विषयांचा अभ्यास केला. माझ्या शिक्षकांनी माझी खूप साथ दिली. मी बुद्धिबळ खेळायची. त्यामुळे माझा अभ्यास बुडायचा. माझ्या शिक्षकांनी आणि कॉलेजने खूप सपोर्ट केला. मी खेळामुळे कॉलेजला जास्त जाऊ शकले नाही. पण शिक्षकांच्या सपोर्टने मी हे यश प्राप्त केलं आहे. तनिषाचा आवडता विषया कोणता असे तिला विचारण्यात आले होते. त्यावर ती म्हणाली की, अकंउट्स विषय माझा आवडता होता. त्यात मला ९५ मार्क्स मिळाले. मला ओसीएम, इकोनॉमिक्स आणि पाली या विषयात १०० मार्क्स मिळाले.