गोवा बनावटीच्या अवैध दारू वाहतूकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. एकूण ७० लाख १३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; दोघे ताब्यात.
सावंतवाडी
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली चेकनाक्यावर वहानानची तपासणी करत असताना आर.जे.32 -जी.बि.- 7574 हा कंटेनर आला.कंटेनरची झडती घेतली असता कंटेनरमध्ये गोवा बनावटीच्या चोरट्यादारूचे वेगवेगळ्या कंपनीचे खोके सापडून आले.कारवाई मध्ये 52 लाख रूपये किमंतीचा कंटेनर, 18 लाख 3 हजार 200 रूपये किमंतीची चोरटी दारू,10 हजार रूपये किमंतीचा विवो कंपनीचा मोबाईल मिळून 70 लाख 13 हजार 200 रूपयांच्या मुद्देमालासह नोशाद इसराईल खान वय वर्षे 24 चालक, रा.मेवात हरियाणा,विष्णू कुमार जाट वय वर्षे 25 रा.करौली राजस्थान या दोघा संशयीतावर कारवाई करून ताब्यात घेतले.
सदरची कारवाई अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरिक्षक प्रदिप रास्कर, दुय्यम निरीक्षक तानाजी पाटील,सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, जवान दिपक वायदंडे, चालक रणजीत शिंदे यांनी इन्सुली चेकनाक्यावर केली. अधीक तपास प्रदिप रास्कर करत आहेत.