आगामी काळात होणाऱ्या निवडणुकात संघटना वाढवण्यासाठी नार्वेकरांनी प्रयत्न करावे: सचिन वालावलकर. किनारपट्टी भागातील शिवसेना तालुका प्रमुखाची जबाबदारी काशिनाथ नार्वेकर यांच्याकडे.
वेंगुर्ला.
येथील किनारपट्टी भागातील शिवसेना तालुका प्रमुखाची जबाबदारी काशिनाथ नार्वेकर यांच्याकडे देण्यात आली आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकात संघटना वाढवण्यासाठी नार्वेकर यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी केले.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज वेंगुर्ला तालुक्यात शिवसेनेची सुधारित बैठक झाली.जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, जिल्हा समन्वयक सुनील दुबळे, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, तालुका समन्वयक बाळा दळवी, महिला तालुका समन्वयक प्राची नाईक, युवासेना शहरप्रमुख संतोष परब, विभागप्रमुख संजय परब, कौशिक परब, किनारी तालुकाप्रमुख काशिनाथ नार्वेकर, शिरोडा माजी उपसरपंच काशिनाथ नार्वेकर आदी उपस्थित होते. पेडणेकर, शीतल साळगावकर, मितेश परब आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील ७ प्रमुख पदाधिकारी यांची कमिटी तयार करून तालुक्यातील विविध कार्यकर्त्यांची पदावर नियुक्ती करण्यात येणार असून तसेच पुढील आठवड्यात संघनात्मक मजबुतीच्या दृष्टीने पाऊले उचलण्यात येतील असेही यावेळी श्री.वालावलकर म्हणाले.यावेळी सुनील डुबळे, बाळा दळवी यांनी मनोगत व्यक्त केले.तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत आभार व्यक्त केले.