जय भवानी एज्युकेशन सोसायटी संचलित सुमन विद्यालय, टेरव प्रशालेचा दहावीचा निकाल १००%

चिपळूण
जय भवानी एज्युकेशन सोसायटी संचलित सुमन विद्यालय, टेरव प्रशालेचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एस. एस. सी.) परीक्षा मार्च २०२५ चा निकाल प्रतिवर्षाप्रमाणे १००% लागला असून, विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत विद्यालयाचा गौरव वाढविला आहे.या परीक्षेत कुमार आदित्य गोपीचंद कदम याने ९२.८०% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कुमारी सिद्धी अनंत कदम हिने ९२.४०% गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर कुमार समर्थ सुदेश साळवी याने ९१.६०% गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला.सदर निकालामध्ये प्रशालेमधून एकूण ३१ विद्यार्थ्यांपैकी विशेष प्रावीण्य श्रेणीत १२ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत १४ विद्यार्थी आणि द्वितीय श्रेणीत ५ विद्यार्थी यांनी नेत्रदीपक यश मिळवले.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विकासराव कदम, सचिव योगेशराव कदम, खजिनदार अजितराव कदम तसेच संस्थेचे सर्व संचालक, सभासद, ग्रामस्थ, हितचिंतक व पालक यांच्या वतीने अभिनंदनचा वर्षाव करण्यात आला.