वेंगुर्ला आगारातर्फे अष्टविनायक दर्शन यात्रेचे आयोजन. प्रवाशांनी लाभ घ्यावा; आगार व्यवस्थापक यांचे आवाहन.
वेंगुर्ला.
गतवर्षीच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर प्रवाशांच्या आग्रहस्तव 'श्रावण मांसात' वेंगुर्ला आगारातर्फे दि. ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०२३ या दरम्यान "अष्टविनायक दर्शन" यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरच्या यात्रेचा खर्च प्रतिमाणशी रुपये २५०० एवढा राहील. सदर खर्चात प्रवास व राहण्याची सोय केली जाईल. तरी प्रवाशांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आगार व्यवस्थापक श्री.राहुल कुंभार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी निलेश वारंग - ९४२२५८५८५९ , अनंत नाईक - ७८७५८८४१६०, तसेच मकरंद होळकर, नंदू दाभोलकर यांच्याशी संपर्क साधावा.