राष्ट्रवादी काँग्रेसचे संपूर्ण महाराष्ट्रात सभासद नोंदणी अभियान सुरू

राष्ट्रवादी काँग्रेसचे संपूर्ण महाराष्ट्रात सभासद नोंदणी अभियान सुरू

सावंतवाडी

 

       सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सावंतवाडी येथे जिल्हा कार्यकरिणीतर्फे सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला, सदर सभेत जिल्ह्यात किमान ५००० सदस्य नोंदणी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.ओ. बी.सी सेलचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कल्याणकाका आखाडे यांचा महाराष्ट्र पदाधिकारी संवाद अभियान दौरा दिनांक. २१/०३/२०२५ रोजी असून ओ.बी.सी सेलचा हा दौरा यशस्वी करण्यासाठी याचे नियोजन करण्यात आले.सदर सभेत सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, जिल्ह्याचे चिटणीस सावळाराम आणावकर गुरुजी, प्रदेश चिटणीस सुरेश गवस, प्रदेश चिटणीस एम.के.गावडे, जिल्हा उपाध्यक्ष एम.डी. सावंत, संदीप राणे, ओ.बी.सी सेलचे जिल्हाध्यक्ष सर्वेश पावसकर, दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष साबाजी सावंत, अल्पसंख्याकचे जिल्हाध्यक्ष अस्लम खतीब, सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले, कुडाळ तालुकाध्यक्ष आर. के.सावंत, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर, दोडामार्ग तालुकाध्यक्ष सत्यवान गवस, उपाध्यक्ष मेघेन्द्र देसाई, सावंतवाडी महिला तालुकाध्यक्षा रिद्धी परब, दोडामार्ग महिला तालुकाध्यक्षा मानसी देसाई, विलास पावसकर, जिल्हा सदस्य गुरुदत्त कामत, रोहन परब, दीपक देसाई, कुडाळ येथून मिनानाथ बाबुराव वारंग, राजू वळवी, विराज बांदेकर, योगेश हेरेकर  तसेच कणकवली येथून निशिकांत कडुलकर, सतीश पताडे इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.