सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी नारायण राणे यांना संधी द्या : निलम राणे. वेंगुर्ला तालुक्यातील परुळे येथे प्रचाराचा शुभारंभ.

वेंगुर्ला.
सिंधुदुर्ग जिल्हावासीयांच्या विकासासाठी गेली 35 वर्ष अहोरात्र काम करीत असलेल्या नारायण राणे यांना खासदारकीच्या माध्यमातून सेवा करण्याची पुन्हा एकदा संधी देऊन त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या.आणी ‘अबकी बार ४०४ पार’ ‘फिर एक बार मोदीसरकार’ येण्यासाठी येत्या ७ मे या भाजपाच्या कमळ निशाणीला मतदान करा असे आवाहन सौ. निलम राणे यांनी परुळेबाजार येथील आयोजित महीला मेळाव्यात बोलताना केले.
लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या
प्रचारा निमिताने निलम राणे यांच्या वेंगुर्ला तालुक्यातील प्रचाराचा शुभारंभ परुळे येथून करण्यात आला.
यावेळी भाजपा महीला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर माजी सभापती अस्मिता बांदेकर, संध्या तेरसे, माजी जि.प अध्यक्षा सुमेधा पाताडे, अँड सूषमा खानोलकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रज्ञा परब, भाजपा तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, माजी सभापती वंदना किनळेकर, सारीका काळसेकर, बाजार समिती सदस्य सुजाता देसाई, माजी पं.स.सदस्य गौरवी मडवळ, माजी सरपंच प्राजक्ता चिपकर, श्वेता चव्हाण, माजी.पं.स सदस्य प्रणाली बंग, ग्रामपंचायत सदस्य सीमा सावंत, भाजप बूथप्रमुख दिपा दाभोलकर यांसह म्हापण जि.प.मतदार संघातील महीला पदाधिकारी व महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी माजी सभापती निलेश सामंत, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, प्रसाद पाटकर, प्रकाश राणे गुरुनाथ मडवळ यांसह पदाधिका-यांनी सौ.राणे यांचे स्वागत केले.
यावेळी श्वेता कोरगांवकर सुमेधा पाताडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.विविध जनकल्याणकारी योजना राबविणाऱ्या व भारत देशाची मान जगभरात उंचावणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पुन्हा तिस-या वेळी पंतप्रधान कण्यासाठी हि निवडणूक महत्त्वाची आहे.
नारायण राणे यांना निवडून आणण्यासाठी कामाला लागा असे आवाहनही उपस्थितांना करण्यात आले. गोली 35 वर्ष नारायण राणे जिल्ह्याविषयी विकासाचे स्वप्न घेऊन काम करीत आहेत यासाठी खासदार झाले तर त्याना आणखी बळकटी मिळेल.आपणराणे कुटुंबीयांना ३५ वर्ष आपण भरपूर प्रेम दिलेत तसेच यापुढे ही द्याल असे मत सौ.नीलम राणे यांनी व्यक्त केले.न मागता सर्व काही देणाऱ्या मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी आपण सर्वानी प्रयत्न करूया असे आवाहन करण्यात आले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माजी सभापती वंदना किनळेकर तर आभार दिपा दाभोलकर यांनी मानले.