विद्यार्थ्यांनी अभ्यास करुन ज्ञानाचा विकास करावा :माजी आमदार शंकर कांबळी.......शिरोडा वेळागर येथील श्री देव लिंगेश्वर मंदिराचा २३ वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न

विद्यार्थ्यांनी अभ्यास करुन ज्ञानाचा विकास करावा :माजी आमदार शंकर कांबळी.......शिरोडा वेळागर येथील श्री देव लिंगेश्वर मंदिराचा २३ वा  वर्धापनदिन उत्साहात संपन्न

 

शिरोडा

 

    वयानुसार अभ्यास  आणि शारिरीक बौध्दीकता याची सांगड घालुनच शैक्षणीक पध्दती केली आहे. विद्यार्थ्यांनी ज्या वयात शिक्षण घ्यायचे त्या वयात शिक्षण घेऊन अभ्यास करुन ज्ञानाचा विकास करावा.यामुळे विद्यार्थ्यांबरोबर गावाचे व जिल्ह्याचे नांव उज्वल होते. असे मार्गदर्शन शिरोडा वेळागर येथील श्री देव लिंगेश्वर मंदिराच्या वर्धापनदिनी, विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात  माजी आमदार शंकर कांबळी यांनी शिरोडा येथे केले. श्री. कांबळी यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे गुणगौरव, शिरोडा गाव व परिसरातील विशेष प्राविण्य मिळवलेल्या तरुण तरुणींचा सन्मान करण्यात आला. तसेच  शिरोडा वेळागर येथील भगत कुटुंबाने, श्री देव लिंगेश्वर यांच्या २३ व्या  वर्धापन दिनानिमित्त दर्शनास आलेल्या हजारो भाविकांना महाप्रसाद दिल्याने भगत कुटुंबाचा कुटुंब प्रमुख म्हणून प्रभाकर भगत यांचा मंडळाच्या वतीने शंकर कांबळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष जगन्नाथ डोंगरे,  माजी अध्यक्ष विजय पडवळ, मदन अमरे, भाई रेडकर, प्रमोद नाईक, पडवळ गुरुजी, पांडुरंग नाईक व पदाधिकारी उपस्थित होते. शिरोडा ग्रामदैवत श्री लिंगेश्वर मंदिराचा २३ वा  वर्धापन दिन मंगलमय वातावरणात मानकरी व हजारो भाविकांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला. शिरोडा ग्रामदैवत श्री देव लिंगेश्वराची परिपुर्ण  कृपादृष्टी शिरोडा परीसरातील प्रत्येक भाविकांवर असल्याने प्रत्येकांची श्रध्दा दिवसेंदिवस वृध्दींगत होत आहे. हे, संपन्न झालेल्या या वर्धापन दिनाच्या उपस्थितीवरुन दिसुन आले. सकाळचे धार्मिक विधी, महाप्रसाद, सायंकाळी पालखी, विद्यार्थी गुणगौरव, मिरवणुक दशावतार नाटक होईपर्यंत भाविक मंत्रमुग्ध होऊन श्रींच्या परिसरात उपस्थित होते.
   या वर्षी शिरोडा वेळागरचे मानकरी भगत परीवाराने उपस्थित भाविकांना महाप्रसाद दिला यासाठी सावळाराम भगत, भालचंद्र भगत, प्रकाश भगत, चंद्रशेखर भगत, उदय भगत, सुनिल भगत,  अशोक भगत समीर भगत, विजया भगत, मयुर लाड, सतिश गवळी, भावेश मसुरकर  तसेच भगत कुटुंबाची कन्या, पुणे येथील फाॅरेस्ट अधिकारी असलेली कु. दिपाली सावळाराम भगत यांनीही मोठे परीश्रम घेतले. भगत कुटुंबाची या उत्सवात ५५ बांधवांची उपस्थित आणि एकजुट खरोखरच समाजाला आदर्श देणारी असल्याचे माजी आम. कांबळी यांनी सत्कारप्रसंगी सांगत कौतुक केले.