तिमाही ई आर १ चे विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत ऑनलाईन पध्दतीने भरण्याचे आवाहन.

सिंधुदुर्ग.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग या कार्यालयाचे मनुष्यबळाचे मार्च 2024 या तिमाहीचे ई आर 1 हे विवरणपत्र 30 एप्रिल 2024 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने भरण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ग.पा. चिमणकर यांनी दिली आहे.
सेवायोजन कार्यालये (रिक्त पदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारा) कायदा 1959 अन्वये कलम 5 मधील तरतुदीनुसार शासकीय / निमशासकीय/ खाजगी आस्थापनेत काम करीत असलेल्या कर्मऱ्यांच्या माहितीचे तिमाही विवरणपत्र ई आर- 1 प्रत्येक तिमाही संपल्यावर 30 दिवसाचे आत सादर करणे प्रत्येक आस्थापनेस बंधनकारक आहे. त्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने विकसित केलेल्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने भरावे.
मार्च 2024 रोजी संपलेल्या तिमाहीचे विवरणपत्र ई आर- 1 वेबसाईटवर दि. 30 एप्रिल पर्यंत ऑनलाईन पध्दतीने भरावे. ज्या उद्योजक/ आस्थापना यांना ऑनलाईन व्दारे विवरणपत्र भरण्यास अडचणी येत असतील तर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र दूरध्वनी क्र.02362 228835 यावर संपर्क साधावा.