भिरवंडे गांधीनगर येथील नुकसानग्रस्त भागाची शिवसेना उबाठा पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी.
कणकवली.
भिरवंडे गांधीनगर येथे काल प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली.यामुळे गावातील संपूर्ण भातशेती जमीनदोस्त झाली तसेच वरचीवाडी येथील पायवाट वाहून गेली, ४ विहिरी पाण्याखाली गेल्यामुळे त्या ढासळल्या आहेत. लोकांचे चिरेबंदी गाडगे वाहून गेले, काजू कलमे, नारळाची रोप वाहून गेले, लोकांच्या घरात पाणी घुसून घरातील भांडी वाहून गेली असे प्रचंड आर्थिक नुकसान झाले.
या घटनेची माहिती तात्काळ उबाठा शिवसेना तालुका प्रमुख प्रथमेश सावंत यांनी विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांना दिली व त्यानी तात्काळ तहसीलदार देशपांडे याना माहिती दिली व तेथे जावून वस्तुस्थिती पाहून त्वरित पंचनामे करून लोकांना तत्काळ मदत करावी अशी विनंती केली.
यावेळी घटनेची पाहणी करताना शिवसेना उबाठा तालुका प्रमुख, प्रथमेश सावंत, उपजिल्हप्रमुख बेनी डिसोजा, युवासेना उपजिल्हप्रमुख मुकेश सावंत, सरपंच बोभाटे, उपसरपंच बाळा सावंत, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी विभागाचे कृषितज्ज्ञ, आरोग्य विभागाचे डॉक्टर, तसेच शाखाप्रमुख प्रकाश सावंत, प्रथमेश सावंत, बंटी सावंत, तेजस सावंत, शुभम सावंत, अभी मिस्त्री आदी उपस्थित होते.