वेंगुर्ला आनंदवाडी येथे माधवबाग कुडाळ मार्फत ११ एप्रिल रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन.

वेंगुर्ला आनंदवाडी येथे माधवबाग कुडाळ मार्फत ११ एप्रिल रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन.

वेंगुर्ला.

   डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, तालुका वेंगुर्ला शहर आनंदवाडी, सावित्रीबाई फुले महिला मंडळ आनंदवाडी वेंगुर्ला, सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई शाखा वेंगुर्ला, दलित समाज सेवा मंडळ आनंदवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १३३ वा जयंती उत्सव सोहळा दिनांक ११ ते १५ एप्रिल २०२४ रोजी या कालावधीत वेंगुर्ला आनंदवाडी येथे साजरा करण्यात येणार आहे.
   यानिमित्ताने माधवबाग कुडाळ शाखेच्या वतीने दिनांक ११ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत आनंदवाडी समाज मंदिर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात हृदयरोग, मधुमेह, ब्लड प्रेशर, ब्लॉकेजेस, संधिवात, लठ्ठपणा, थायरॉईड अशा आजार असणाऱ्या रुग्णांची तपासणी केली जाणार आहे.ज्या रुग्णांना वरील आजार किंवा त्यासंबंधी लक्षणे असतील, अशा रुग्णांची मोफत तपासणी केली जाणार आहे.अधिक माहितीसाठी क्लिनिक फोनः ९०११३२८५८१/ कॅम्प साठी ८२०८६७६४२४ या क्रमांकावर संपर्क साधावा.तरी जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.