जय महाराष्ट्र कला क्रीडा मंडळ चषकाचा मानकरी ठरला आझाद फोंडा संघ. जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत २८ संघांनी घेतला सहभाग.

जय महाराष्ट्र कला क्रीडा मंडळ चषकाचा मानकरी ठरला आझाद फोंडा संघ.  जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत २८ संघांनी घेतला सहभाग.
जय महाराष्ट्र कला क्रीडा मंडळ चषकाचा मानकरी ठरला आझाद फोंडा संघ.  जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत २८ संघांनी घेतला सहभाग.

सावंतवाडी.

   जय महाराष्ट्र कला क्रीडा मंडळ सावंतवाडी व सावंतवाडी होकर संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने वयोमर्यादित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा सेंटर उर्दू हायस्कूलच्या मैदानावर घेण्यात आली या स्पर्धेत जिल्ह्यातील नामवंत 28 संघाने सहभाग घेतला त्या स्पर्धेचे उद्घाटन मंडळाचे अध्यक्ष आणि माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिवभवानी कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर,आई लक्ष्मी जाधव श्रीमती सरस्वती जाधव श्री कृष्णा सावंत श्री गोसावी श्री चव्हाण अजय जाधव गणेश जाधव उपस्थित होते.
   या स्पर्धेचा अंतिम सामना आझाद फोंडाविरुद्ध जय मानसेश्वर वेंगुर्ला यांच्यामध्ये झाला यात जय मानसेश्वर संघावर मात करत आझाद फोंडा संघाने प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक जय मानसेश्वर संघाला मिळाला तृतीय क्रमांक जय महाराष्ट्र सावंतवाडी व चतुर्थ क्रमांक भद्रकाली गुडीपूर पिंगुळी यांनी पटकावला प्रथम क्रमांक विजेत्या आझाद फोंडा संघाला रोख रक्कम 5000 व चषक देऊन गौरविण्यात आलं तर द्वितीय क्रमांक जय मानसेश्वर वेंगुर्ला रोख रुपये तीन हजार व चषक देऊन गौरवण्यात आलं तसेच तृतीया आणि चतुर्थ क्रमांक पटकावलेल्या संघांना रोग रक्कम व चषक देऊन गौरवण्यात आले तसेच वैयक्तिक आकर्षक बक्षीसांमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून आझाद फोंडा संघाचा नार्वेकर तर उत्कृष्ट चढाई म्हणून जय महाराष्ट्र सावंतवाडी संघाचा गावडे उत्कृष्ट पकड म्हणून जय मानशेश्वर वेंगुर्ला संघाचा ओमकार साठेलकर यांना गौरवण्यात आले या स्पर्धेच्या भक्षण वितरणावेळी शोभा आणि कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अरविंद कर आई लक्ष्मी जाधव श्रीमती सरस्वती जाधव जोशी मॅडम श्रीकृष्ण सावंत श्री गणेश जाधव अजय जाधव अमेय देसाई हे उपस्थित होते.
   तर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंच म्हणून कृष्णा सावंत मोसिन शेख विश्राम नाईक शैलेश नाईक मयूर सुभेदार अमेय देसाई व मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सर्व संघांना जेवणाचे व्यवस्था जय महाराष्ट्र कला क्रीडा मंडळाच्या वतीने करण्यात आले व सर्वांना चांगला व्यासपीठ मिळवून देण्याचं काम या मंडळाच्या वतीने करण्यात आले सर्व खेळाडूंनी जय महाराष्ट्र कला क्रीडा मंडळाचे आभार मानले.